स्थुलतेची टाळे बला अजूनही आपल्या देशात व्यायामाला समानार्थी शब्द आहे कंटाळा ! हाss हाsss काय झालं हसू आलं ना? पण हेच वास्तव आहे. व्यायाम करण्यापेक्षा तो टाळण जास्त सोप्प आहे असं आजही बहुतांशी लोकांना वाटत. पण लक्षात घ्या इथेच आपण चुकतो. व्यायामाला जगात पर्याय नाही. सर्व साधारण पणे लोकांना व्यायाम टाळण्यासाठी खालील कारणे द्यायला आवडते – 1. माझे शेड्यूल खूप बिझी असते त्यामुळे मी व्यायाम करूच शकत नाही 2. मला खूप घरकाम असते, मला व्यायामाची गरजच नाही (हे विशेषत: स्त्रियांच्या…